दोन वर्षांच्या विलंबानंतर पीएम केअर्स फंडाची माहिती समोर; ३१ मार्च २०२५ पर्यंत ८,४५२ कोटी रुपयांची शिल्लक
पीएम केअर्स फंडाने दोन वर्षांच्या विलंबानंतर आपल्या वेबसाइटवर आर्थिक वर्ष २०२३-२४ आणि २०२४-२५ चे लेखापरीक्षित आर्थिक विवरण (ऑडिट रिपोर्ट) अपलोड केले आहेत. हे दस्तऐवज १७ ऑगस्ट रोजी वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आले.
या खात्यांचे ऑडिट ६ ऑगस्ट रोजी पूर्ण झाले आणि ७ ऑगस्ट रोजी ऑडिटर्सनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या.

